STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

उपयोगिता मूल्य

उपयोगिता मूल्य

1 min
152

पुढच स्थान मिळवायचं असेल तर

बुद्धिमत्ता,कौशल्य तुमच्याकडे असावं,

उद्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी

अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण व्हावं...


स्वतःच्या कृतीची,कौशल्याची गुंतवणूक 

एकाच क्षेत्रात नका करू,

अनेक क्षेत्रात, अनेक व्यक्तींजवळ

गुंतवणूकीचे पर्याय ठेवून द्या उरू...


जोपर्यंत तुमचा उपयोग असतो

तोपर्यंत तुमच्या असण्याला अर्थ,

उपयोगिता मूल्य नसेल तर

तुम्ही असून नसल्यासारखे व्यर्थ...


स्वतःचं उपयोगिता मूल्य वाढवा

तुमची गरज निर्माण करावी,

तुमच्याशिवाय नाही पर्याय

इतरांच्या मनात आशा जिवंत ठेवावी...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics