STORYMIRROR

Pandit Warade

Classics

3  

Pandit Warade

Classics

गवळण

गवळण

1 min
15.2K


जाऊ दे ना बाजाराला

नंदलाला रे गोपाला।।धृ।।


माठ घेऊनी दह्या दुधाचा

रस्ता धरतो आम्ही मथुरेचा

अडवीशी का रस्त्याला।।१।।


दही दूध जरी आम्ही विकतो

गोविंद गोपाळ घ्या हो म्हणतो

मदत अमुची तव कार्याला।।२।।


कंस राजाची जुलमी सत्ता

होती त्रासली तिथली जनता

कंस मारून दिलासा दिधला।।३।।


बनून कैवारी पांडवांचा

सांभाळ केलास तू धर्माचा

वस्त्र पुरवीशी द्रौपदीला।।४।।


कारागृहामध्ये जन्म घेतला

कसे जगावे धडाच दिधला

गीता दर्शन मानवाला।।५।।


जरासंध, शिशुपाल मारिला

ठार केलेस नरकासुराला

मुक्त सोळा सहस्त्र बाला।।६।।


विनंती करते गौळण राधा

पुन्हा एकदा ये रे मुकुंदा

देई दर्शन "पंडिताला" ।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics