STORYMIRROR

Mangesh Medhi

Classics

3  

Mangesh Medhi

Classics

सखी

सखी

1 min
14.8K


आता कविताच माझी सखी

तिने साद द्यावी अन् मी न लिहावे

एवढा निष्ठूर होऊ कसा


मी लाख टाळेन, विसरेनही

पण ती मज सोडेल कशी


नशा अशी अन् प्रित ही

की हरवून मज वाहीन मी


ही घट्ट मिठी हा बंध रेशमी

प्रेमात मी, धुंदीत मी

क्षणोक्षणी नवा जन्मतो मी

सहवास हा सुखाहुनी सुखी


खुलविले तिनेच सौंदर्य जगी

फुललेली, सजलेली वाट ही

अन् उमटते लावण्य नभी

आनंद रोमांच ठायीठायी

तिनेच तर जागविले माझ्या मनी


भेटतो आज दिसतो तुम्हास

उद्यास कदाचीत गवसणार नाही


गुंततो, फसलो, भुललो तीला मी

माझा न मी उरलो जराही

दोष न द्यावा, राग नसावा

तिच्या समेत, तिच्या मध्येच

केंव्हातरी हलकेच असेनही मी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics