पांडुरंग अभंग
पांडुरंग अभंग
अगा पांडुरंगा । धाव पाव मला ।
काय सांगू तुला । माय बापा ।।
कित्येक आले रे । कित्येक गेले रे ।
खेळ निराळे रे । पांडुरंगा ।।
वारीत आलेलो । तुला भेटलेलो ।
तुला नडलेलो । कृपेसाठी ।।
तू रे अवखळ । तू रे निष्ठुरकी ।
खेळ खेळालासी । लपाछपी ।।
शोधूनी दमलो । पुरता थकलो ।
पाण्यात भिजलो । पावसाने ।।
आता म्हणतोस । तुझ्यातच होतो ।
काहीही सांगतो । लडीवाळा।।
कसारे असा तू । बेफिकीर बाप ।
लेकराना ताप । उगा देसी ।।
आत्ताच सांगतो । भार तुझ्यावर ।
मीच टाकणार । जन्मोजन्मी ।।
कृपावन्त मीच । भाग्यवन्त मीच ।
माय बाप तूच । माझ्यासाठी ।।
