STORYMIRROR

Prashant Shinde

Classics Others

3  

Prashant Shinde

Classics Others

श्रद्धांजली!

श्रद्धांजली!

1 min
14K


शून्यातून विश्व निर्मिती

याची डोळा याची देही

साऱ्या विश्वाने पाहिले...


ज्या देशाने विश्वाला

शून्य दिले

त्या शून्याचे मोल हे जाणले..


जाता जाता

अटळ सत्य हे

अटलजींनी विश्वास दाविले...


देणे हा अभिजात

गुण रक्तातला

भारतभूच्या सुपुत्राने जाणला..


जन्म सारा देण्यासाठी

या सुपुत्राने देशाला देऊन सारे

मान भारतभूचा राखला...


शून्यातून येऊन

शून्य होऊनी जाताना

स्वतः शून्यात शून्य होऊनी चालला...


जेजे चांगले जगती

ते ते सारे मागे ठेवून

अटल शांतीनिवासी

अटल शांतीने

शून्यात शांतीच्या गेला....!!!


अटलजींच्या चरणी भावपूर्ण काव्यात्मक

शब्दसुमनांची श्रद्धांजली...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics