सहजच सुचलेले.......
सहजच सुचलेले.......
शरीर थको कितीही, मनाला कधीच नाही थकू द्यायच.
दुःख हजारो येतील वाट्याला,.निराश नाही व्हायच.
प्रवास आहे आयुष्य,शरीर आहे वहान आत्म्याच
मृत्यू आहे शेवटचा थांबा तो येणार
कधी ना कधी मग का झुरत जगायचं??
माहित आहे एक दिवस जायचंय
मनसोक्त जगुन घ्यायचं
हसत हसतं का रडत ते आपण आपल ठरवायचं.
नाही पडत फरक जगाला आपल्या रडणयानं काही.
हास्याने मात्र क्षणभर दुःखाचा विसर होई.
हास्यामुद्रेने सुखावितात भोवताली मानसं ही
छोट आहे आयुष्य स्वप्न खुप मोठी
त्या स्वप्नांच्या मागे धावताना नका गमवु त्या,
त्या क्षणांच्या गमती.
आला नवा दिवस घेऊन येतो नवी आभा
रात्रीच्या मागुन रोज नवी प्रभा
कधी राग येईल कधी वाटेल वाईट
कधी नकोच वाटेल जगणे
आयुष्य आहे अनमोल जरा बदलून पहा वागणे
किती मोठ जीवन न मागता मिळालेले.
प्रसंगही येतील नाजूक हळवे विचार करायला लावणारे
विचारांना त्या वेचुन पहा
चांगले ते स्वीकारून वाईट द्या की टाकून
ऐकून घ्या त्यांचे बोल जर,
दु:ख सावरायला आसतील प्रेमाची नाती.
कित्येक लोक या जगात एकटे जगती
काळ ,वेळ वेदना सारयानांच आहेत
माणसेच काय पशुपक्षानांही आहेत.
ते कुठे दुःख कवटाळत बसतात
नव्या घरच्या च्या तयारीने नवे झाडं शोधायला
जुन्याच आभाळात नव्याने भरारी घेतात.
म्हणुन सांगावे वाटते भरभरून जगा.
आनंदा च्या रंगी रंगा.
आज,आता, या निमिषात आहे सार
कोणी पाहिलाय ऊद्या सांगा.