STORYMIRROR

भास्कर आग्रे

Classics

3  

भास्कर आग्रे

Classics

आई माझी एकविरा

आई माझी एकविरा

1 min
390

ग्रामदेवता तू || कुलदेवता तू

गावाची शान तू || एकविरा ||१||

आई एकविरा || फुलांनी सजते

शोभुन दिसते || मंदिरात ||२||

भाव सुमनांच्या || गुंफुनिया माळा

वाही तुझ्या गळा || भक्त तुझा ||३||

तुझीया मंदिरी || गरबा रंगला

भक्त हा रमला || सोहळ्यात ||४||

तुझी छत्रछाया || आम्हां भक्तांवरी

सांभाळ तु करी || लेकरांचा ||५||

करीतो वंदन || नमवुनी माथा

दर्शन दे आता || एकविरे ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics