Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

सन्मान आईचा

सन्मान आईचा

1 min
146


आपल्या आयुष्याची सुरवात

आई शब्दानेच होत असते !

आई तुझ्या प्रेमळ मायेला

दुसरी काहीच उपमा नसते !!


बाप नावाच्या सावलीचा आधार

अर्धवट लाभला मला जीवनात !

तळहातावरच्या फोडा प्रमाणे 

आईने जपलयं मला आयुष्यात !!


लहानाचा मोठा केला मला 

आईने मायेच्या उबदार पदरात !

जबाबदारीची जाणीव झाली

आता गुंतलो मी सुखी संसारात !!


समाजसेवेचं बाळकडु जणुं

आईने जन्मताच मला पाजलं !

समाजसेवेच्या प्रत्येक पुरस्कारात

माझ्या आई बाबांच नाव गाजलं !!


आईच्या चरणाची सेवा करताना 

सुवर्ण सोहळ्याचा योग जुळुन आला !

जन्मदात्या माझ्या आईचा सत्कार

आज बघुनी माझा गोत्र सुखावला !


Rate this content
Log in