Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

आई बाबा स्वर्ग सुखाचे घर

आई बाबा स्वर्ग सुखाचे घर

1 min
127


नऊ महीन्यांचा भार

आई झेलते उदरी ,

काळजाच्या तुकड्याला

खेळवीते हातावरी !!


धार अमृताची देई

सावरुन पदराला ,

बोट धरुनी शिकला

दुडूदुडू धावण्याला !!


खस्ता खावून जीवनी

बाप राबे दिनरात ,

घास सुखाचा मिळावा

चिंता असे ती मनात !!


तुला शिकवूणी आता

मोठा केलाय रे पोरा ,

वाईटांच्या संगतीने 

झाला लबाड तू चोरा !!


वैर भावनेचे बोल 

घात तूझा करतील ,

शिकवूनी एकमेकां

कान तूझे भरतील !!


आई बाबांच्या चरणी 

स्वर्ग सुख अनुभवा ,

सेवा करुनी तयांची

मनी शुध्द भाव ठेवा !!


Rate this content
Log in