Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

4.2  

भास्कर आग्रे

Others

मी एक स्त्री

मी एक स्त्री

1 min
484


मी एक स्त्री आहे

अवघ्या जगताची नारी ,

घराघरातुन बागडणारी होते

आई बाबांची लाडकी परी !!


आजच्या धगधगीच्या युगात

पोटासाठी पळतेय सैरभैर ,

तुमच्यासाठीच राबते मी

नका धरु कोणी माझ्याशी वैर !!


सावित्रीमाईंच्या लेकी आहोत

सदैव जिजाऊंपरी लढणार ,

स्त्रीशक्तीचा नारा देत आम्ही

अस्तित्वाची लढाई जिंकणार !!


समाजहितासाठी आम्ही ही झटतो

नका करु कधी आमचा तिरस्कार ,

नावारुपाला येऊद्या आम्हां स्त्रियांना

मिळुदे तुमच्या हातुनच पुरस्कार !!


वंशाचा दिवा आज ना उद्या

सर्वांच्या घरी नक्की येईल ,

दिव्यात जर का वातचं नसेल

तर सगळीकडे अंधारच होईल !!


Rate this content
Log in