Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

खेळ क्रिकेटचा अन् खेळतोय कोरोना

खेळ क्रिकेटचा अन् खेळतोय कोरोना

1 min
195


बालपणीचा खेळ क्रिकेटचा

तीन काट्या अन् चेंडु फळीचा 

मित्र सख्यांच्या सहवासाचा !

लहान मोठेपणा नसे कुणाचा !!


सुख म्हणजे नक्की काय असतं

आज अनुभवतोय जग सारा !

मैदानात रंगला खेळ क्रिकेटचा 

दिसे षटकार चौकारांचा नजारा !!


कोविडरुपी चेंडु विसावला थेट

क्रिकेटप्रेमींच्या घराघरांत !

मैदानेही बंद अन् खेळ ही थांबला

प्रश्न उद्भवतोय मनामनांत !!


फक्त क्रिकेटवरचं का ठेवताय

नेहमी निर्बंधांची टांगती तलवार !

अशा या दुतर्फी निर्णयानेच केला

आमचा पराभव धुव्वाधार !!


अपंगत्वाचाही विसर पाडणारा

वेडा खेळ आहे क्रिकेटचा !

न खेळणाऱ्याला कळणार नाही

गंभीर असतो घाव जखमांचा !!


अक्षरशः चेंडु विचारतोय बॅटला

आता आपण काय निर्णय घ्यावा !

बॅट ने निराशेने उत्तर दिले आता

माझ्यानेच निघत नाहीत धावा !!


Rate this content
Log in