Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

बाबा या घरी सुखाने

बाबा या घरी सुखाने

1 min
145


माझ्या शाळेसाठी बाबा

रोज उठे पहाटेला,

मला शाळेत सोडूनी

निघे घाईने कामाला !!

काम बाबांचे ते दूर

करी रेल्वेने प्रवास ,

जीव माझा मागे पुढे

कधी येतील घरास !!

संसाराचा डोई भार

माझा बाबा तो खंबीर ,

व्याप कामाचा वाढता

होतो मधेच गंभीर !!

गाडी घोड्यांची वर्दळ

नका करु बाबा घाई ,

वाट पाहतात घरी

ताई, दादा अन् आई !!

नका धावू गाडीसाठी

करा प्रवास जपून ,

पोटभर घ्या जेवून

अन् जा तुम्ही झोपून !!

बाबा या घरी सुखाने

नका आणू मला खावू ,

सहवासाविना बाबा

सांगा आम्ही कसे राहू !!


Rate this content
Log in