Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

सुखी संसाराची होळी

सुखी संसाराची होळी

1 min
117


भर दुपारची वेळ

आला काळ तो धावून ,

सुखी संसाराचा थाट

गेला क्षणांत घेवून !!

कमवते चार हात

गेले निघून कामाला ,

अग्नितांडवाने कसा

फेर धरीला घराला !!

फोन येताच घरून

डोळे अश्रूंनी भरले ,

हाहाकार तो पाहता

पाय मागेच सरले !!

डोळ्या देखत जळली

माझ्या कष्टाची रे कुडी ,

सैरभैर मुका जीव

मारी धूरातून उडी !!

नियतीने बघा केली

सुखी संसाराची होळी ,

राख रांगोळीच्या दारी

कोण देईल का? पोळी !!

एक रुपयाचा भार

खिशावर द्याल का रे ,

सदासुत विणवितो

दानशूर व्हाल का रे !!


Rate this content
Log in