Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

खेळ शब्दांचा

खेळ शब्दांचा

1 min
170


दगडाच्या पाटीवर

अक्षरांची ही रांगोळी ,

वर्ण लिहीले अ, आ, इ

किती सुंदर त्या ओळी !!

हाती आली अंकलिपी

भर पडली ज्ञानात ,

नव्याकोऱ्या शब्दांचाही

अर्थ येतोय ध्यानात !!

शब्दभांडाराचा साठा

वाचनालयाच्या दारी ,

अपराध्याला शिक्षेत

बघा शब्द कसा तारी !!

गोड, कडवट शब्द

रोज येतात मुखात ,

शब्द सुमनांच्या माळा

गळा वाहे आनंदात !!

खेळ शब्दांचा खेळता

होतो अर्थाचा अनर्थ ,

शब्द करताच घाव

होई जीवन ते व्यर्थ !!

सदासुत सांगे सर्वां

शब्द जपून वापर ,

शब्द संसार तोडतो

जीव फोडेल खापर !!


Rate this content
Log in