STORYMIRROR

भास्कर आग्रे

Others

2  

भास्कर आग्रे

Others

🌾माझा कृषी राजा🌾

🌾माझा कृषी राजा🌾

1 min
106

तुला अपुल्या 

शेतीची जाणं

नाही तुला कधी

दिला कोणी मानं

बळीराजा तुच या विश्वाची शान ||१||


पंगतीतं सजते 

तुझ्यामुळे पानं

तुझ्याकडे नाही 

कुणाचचं ध्यान

बळीराजा तुच या विश्वाची शान ||२||


कर्जाचा डोंगर 

घेऊन तु डोईवरी

शेत पिकवीशी 

स्वतःच्या हिंमतीवरी

बळीराजा तुच या विश्वाची शान ||३||


नको मागुस भिक 

तु शासन दरबारी

खंबीर हो अन् घे 

कुटुंबाची जबाबदारी

बळीराजा तुच या विश्वाची शान ||४||


शेतकरी राजा 

माझा भोळ्या मनाचा

सदैव विचार मनी 

जनतेच्या हिताचा

बळीराजा तुच या विश्वाची शान ||५||


शेतात पिकवीलेस 

मोत्याचे दाणे

शासन दरबारी 

खरं ठरेल तुझे नाणे

बळीराजा तुच या विश्वाची शान ||६||


Rate this content
Log in