Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

नटला श्रावण महीना

नटला श्रावण महीना

1 min
206


धरतीवर येती श्रावणलहरी

हिरव्या शालुने नटला निसर्ग भारी ,

आनंदाने पक्षी घेती गगनभरारी

सासुरवाशीण लेक ती येई माहेरी !!


श्रावणमासात पुजन होतं शंकराचं

पिंडीवर वाहती दुध अन् पान बेलाचं ,

उपवासाला ताट करती पंचपक्वानाचं

समाधान मिळे पोती अन् ग्रंथवाचनाचं !!


नववधुला मिळे पुजेचा मान पहिला 

मंगळागौरीच्या पुजेला जमल्या महिला ,

दही भाताचा नैवेद्य मंगळागौरीला दावला

झिम्मा फुगडींचा खेळ रातभर रंगला


श्रावण महिना असे सणांचा राजा

पहिल्या सणाचा मानकरी नागराजा ,

सुवासिनी करे त्याची मनोभावे पुजा

माय माऊली घेती फुगड्यांची मजा !!


नारळी पौर्णिमेच्या दिसाला

सोन्याचा नारळ वाहीला दर्याला ,

राखी बांधली भावाच्या हाताला

बहिण ओवाळी लाडक्या भावाला !!


दहीहंडीचा थर एकावर एक रचला

भय,भिती नसे गोपालांच्या मनाला ,

श्रीकृष्ण रुपाने माठ तो फोडला

विविध सणानी श्रावण राजा सजला !!


Rate this content
Log in