कृष्णा भजन🌹
कृष्णा भजन🌹
लाजली कृष्णा ला राधा लाजली है
लाजली कृष्णा ला.....
त्यानी केली कला अशी दाखली
त्यची मुरली ची गोली लागली.... ... लाजली
आली राधा आली चोर पावलानी लपुन
आली हळूहळू वृंदावनाच्या कदमा खाली
नाही कळल्या कोणत्याची काना कुना
राधा कृष्णाची जोडी साजली ... लाजली.....
झाला आहो झाला साऱ्या गोकुळात बोलबाला
अरे अरे अरे कृष्णानी केला गोपालकाला
आला आइन दुपारी यमुना च्या तिरी
श्री हरी ची बासरी वाजली... लाजली.....
केली अहो केली कशी उत्तम कमाल केली
हाय हाय हाय राधा गोळण भुलुन गेली
अहो खरी खरी राधा ही बावरी अशी
प्रीत ही जगात गाजली लाजली.... लाजली.....
