STORYMIRROR

vaishali vartak

Classics Others

3  

vaishali vartak

Classics Others

नशिबाचा खेळ

नशिबाचा खेळ

1 min
197

सर्व लेकरे देवाचीतरी किती विसंगती 

दोन सुखात नांदती दोघे भंगार वेचती       

मनी इच्छा शिक्षणाची बाल मनी असे आस

कधी आम्ही पण जाऊ पूरी व्हावा माझा ध्यास   

आपणच का वंचितनाही नशीबी शिक्षण

गणवेश घालू शिकू कधी येईल तो क्षण.  

नको भंगार वेचणे जाऊ शारदा मंदीरी

घेऊ दप्तरे पाठीशीहीच ईच्छा अंतरी     

कसे ऐटीत जातातपाठी नवीन दप्तर  

आम्ही उचलतो झोळी अंगी जुनीच लक्तर       

हेच ते असे नशीब कोणा मुखी गोड घास

समवयस्क असता मिळे न हवे ते खास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics