STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

2  

Latika Choudhary

Inspirational

माय

माय

1 min
2.6K


माझी माय सरसोती, संस्काराचं गं भांडार

रेघ कोऱ्या पाटीवर, केलं जीवनाचं सार

देव कशाले शोधता, मंदिरात भजनात

देव मले सापडला, मझ्या मायच्या रुपात

तीन तिर्थ चार धाम माझ्या मायचं ग मुख

मायपुढे फिकं साऱ्या जगातलं सुख

जीवनातला सुगंध, माय दारची तुळस

वसे माझ्या हिरदात, मायपणचा कळस

घरच्या गं सुखासाठी, देह चंदन घसावा

खपते गं दिनरात, देत लेकरा विसावा

देह जाळत पोळत, ओला अंतरी जिव्हाळा

आसू डोळा जिरवत, पिके मायेचा गं मळा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational