माय शेतात राबते...
माय शेतात राबते...
मेघराज गरजतो
आभाळ भरून आलं
लागे पेरणीचा वेध
नभी झूंजुमूंजु झालं
पाठी बांधून लेकरू
माय बांध बांध चालं
थंडगार सावलीत
पोरं पान्हा गोड प्यालं
कारभारनीनं बाळ
फांदी वरती टांगलं
विळा धरून हातात
शेत तिने हो कसलं
गेले दिसामागे मास
पोर रांगाया लागलं
मेहनत फळा आली
सोनं शिवारी पिकलं
