STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Inspirational

3  

Laxmidevi Reddy

Inspirational

माय मराठी...

माय मराठी...

1 min
173

माझी मायबोली मराठी भाषा,

प्रत्येक क्षेत्रात माझी अग्रेसर भाषा,

कौतुक जेवढे करु तेवढ कमी आहे,

प्रत्येक गोष्टीत पुढे माझी मराठी भाषा.


मायबोली मराठी माझी, 

समृद्ध भाषा माझी, 

भाषा भिडली रक्तात माझ्या, 

प्रत्येक श्वासात मराठी भाषा माझी.


साऱ्या जगाहून प्यारी मराठी माझी,

साऱ्या जगात भारी मराठी माझी,

साऱ्या जगाला अभिमान माझ्या भाषेचा,

साऱ्या जगाला स्वाभिमान मराठी असल्याचा.


तरी काही जण विसरायला लागलेत माझ्या भाषेला,

मान द्यायला लागलेत विदेशी भाषेला,

अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी,

अशा लोकांना माफी मागायला सांगा माझ्या भाषेला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational