माय मराठी बोली आमुची
माय मराठी बोली आमुची
माय मराठी माझी अमृताहूनी गोड!
मयूरपंखाच्या लेखणीस नाही तोड!!
ऐकून तिजला होती कानही ते तृप्त!
धन्य वाटते बोलता होऊन कृतकृत्य!!
साधी सरळ समजण्यास ती सुलभ!
होवो प्राप्त ऐश्र्वर्यअन्योन्य व दुर्लभ!!
सहज मिसळून जाते सा-यां भाषांसंगे!
तू एकमेव ज्ञानसरीता असशी ज्ञानगंगे!!
माय तुझ्या पुढे मी आहे अजूनी तान्हा!
शब्दांत सोड गे माझ्या अमृताचा पान्हा!!
तुझ्या रक्षणार्थ आम्ही सदा राहू तत्पर!
नेऊन कळसास साहित्य तुझेच सत्वर!!
जन्म मिळो पुन्हा गाण्यास तुझी किर्ती!
माय मराठी ज्ञानदेवी ,तूच खरी स्फूर्ती!
