मावळतीचा सूर्य
मावळतीचा सूर्य


मावळतीचा सूर्य
खुप काही शिकवून गेला
नव्या सूर्याला समज देवून गेला
बेफिकीरीने जगणारी माणस
किती विवंचनेत जगलीत
इच्छा नसतांनाही
एकमेकांपासून अंतर ठेवून राहीलीत
कधी आभाळाकडे न बघणारा माणूस
रोज नव्या किरणांची वाट पहायचा
काळजीत राहून
जगं अस्तित्वात असल्याचे
डोळे भरून बघायचा
सर्वत्र शुकशुकाट, स्मशान शांततेने
माणूस जिवंतपणीच मेला होता
स्वतःपासून दूर कुठेतरी हरवला होता
भिंतीवर कॅलेंडर होते
पण वार तारीख दिसत नव्हती
दिवस दुसरा बघण्याची
कोणाला शाश्वती नव्हती
माणूस घराता कोंडला गेल्यामुळे
आपली माणस दिसायला लागली
संकटात एकमेकांसोबत
जग
ायला लागली
घर होते की नव्हते
काहीच कळायचे नाही
घरात राहुनही घराला घरपण मिळायचे नाही
नेहमीच आपल्या गुर्मीत जगणारा माणूस
एका क्षणात जमीनीवर आला
तेव्हा कुठे माणसातला माणूस
माणुसकीत आला
पुढेपुढे पळणारा माणूस
आपुलकीने कोणाची
विचारपूसही करत नव्हाता
जरावेळ थांबून
मागे वळून बघतही नव्हता
वेळकाळ कशी येईल
काही सांगून येत नाही
होत्याचे नव्हते करायला
कोणाची अनुमती घेत नाही
संकट कसेही असुदेत
प्रत्येकाला सांभाळून घ्यायचे
माणसाने माणसाशी माणुसकीनेच वागायचे
खरंच गेला तो काळ
खूप काही सांगून गेला
माणूस जोडण्याची
कला शिकवून गेला