STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

माता लक्ष्मी

माता लक्ष्मी

1 min
348

लाल वस्त्र परिधान करूनी

आरूढ होते कमळात!!

जगताची जननी माता

वसते नेहमी नयनात


भक्तासी प्रसन्न होते

जेव्हा करती धावा!!

कोमल हृदय तिच्या ठायी

सर्वजण करी देवीची सेवा


शंक चक्र गदा हस्ती

असे माता वैभवाची!!

पूजा करती सकल जन

देवी असे सौभाग्याची!!


चंचल स्वरूप मातेचे

नांदते ती सत्याजवळ!!

स्वच्छता शांतता प्रिय देवी

नांदे ती त्याच्याजवळ!!


भाग्यलक्ष्मीची रूपे अनेक

आठ रुपे महान!!

अनेक नावे देवीचे

ना कोणी मोठा न कोणी लहान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational