मानवतेचा नायक आंबेडकर
मानवतेचा नायक आंबेडकर
भारतीय संविधानाच्या शिल्पकार
वाहते कोटी कोटी प्रणाम तुजला
समानतेचा मानव जन्मला बाबासाहेब
दुजा श्रेष्ठ अजून नाही कोणी प्रगटला.
डॉ.बाबासाहेब लोक कल्याणास
रात्र दिन झटले,महा मानव ठरले
महाडच्या चवदार तळ्यासाठी लढले
आपल्या बांधवाकरता सतत लढले.
तसेच काळाराम मंदिरासाठी लढले
तेव्हा होता स्त्रिया बंदिस्त चौकटीत
'मनुस्मृती' जाळुनी दिले स्वातंत्र
बौध्द धर्म स्वीकारला मानव जातीत.
अभिमानास्पद उंची गाठली शिक्षणात!
पंडितांना ही मागे टाकले विद्वत्तेने
विविध भाषेत ही प्राविण्य संपादिले
श्रेष्ठ एकमेव नायक ते विद्याज्ञानाने.
धम्मचक्र कोरले, ध्वजावर देश शानास
आंबेडकर एकमेव महामानव ठरले
भारतीय संविधानची शिल्पकृत्तीमुळे
भीमराव आंबेडकर 'भारतरत्न' ठरले.
