मानवातील पशू
मानवातील पशू
पशू आणि मानवात
आज भेद न राहिला
मानव पशूसारखा
बघा कसा वागू लागला
स्वार्थासाठी विकुनी स्वाभिमान
श्वानासारखा मागे फिरतो
फायद्यासाठी लाचार होऊनी
न जाणो काय मिळवतो
कोल्ह्याला म्हणतो धूर्त
पण त्यावरही मारली बाजी
पाठीमागे निंदानालस्ती
तोंडावरती हांजी हांजी
हिंस्र श्वापदे करती
लक्तरे शरीराची
तसाच मानव सुद्धा
चिंधड्या करी विश्वासाची
भय वाटे मानवाला
मानवातल्या पशुचे
पाठीवरती वार करून
तोंडावर गोड बोलणाऱ्यांचे