STORYMIRROR

Dipti Gogate

Inspirational

2  

Dipti Gogate

Inspirational

मानूया २०२१ चे आभार

मानूया २०२१ चे आभार

1 min
122

थोडी काही स्वप्नं

तर झाली आहेत साकार

वाईट स्मृतींना बाजूला ठेवून

मानुया २०२१ चे आभार!


बाहेर फिरता आले नाही

याची वाटली हळहळ

तंत्रज्ञानाने मात्र

जग आलं अगदी जवळ

वाहतूक व्यवस्थेवरचा हलका झाला भार

मानुया २०२१ चे आभार!


प्रत्यक्ष भेटता नाही आलं

तरी ऑनलाईन भेट तर झाली

निर्बंध पाळून का होईना

कार्य पार पडली

छोट्याश्या जल्लोषातही आनंद अपार

मानुया २०२१ चे आभार!


बघुया काय घडतंय

२०२२ मध्ये

आरोग्य उत्तम राखणे

एवढंच आपल्या हातामध्ये

आहे त्या परिस्थितीचा करूया स्वीकार

मानुया २०२१ चे आभार!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational