STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Others

3  

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Others

मानपान

मानपान

1 min
200

वेळ निघून गेली, तसा काळही सरला.

गप्पा मारणाऱ्या मोठेपणाच्या, गप्प काय तो उरला.


काय तुझा तो मोठेपणा, थोडा तरी दाखव.

उरलेला बाकी काय तो, तुझा तुलाच साठव.


साठवलय तसं खूप काही, वाटत असेलही अभिमान.

श्वास मावळती सोबत सगळं संपेल, उरेल तेवढं रामनाम.


चौघांची सोबत एक शिकाळं, शेवटचा प्रवास हा असा काई.

संपताना मात्र उर भरून येई, सगळं आपलं परकं ते पळून जाई.


गेलेल्याच्या इथे खूप काढतात आठवणी, देतात उदाहरणे कित्येक.

हयात गेली सोबत ज्यांच्या, नावे तो ठेवतो प्रत्येक.


बोलेल कोनी चांगलं कोनी वाईट, ऐकायला नसतील आपले कान.

संपलेल्या आयुष्यावर मग चर्चा, त्याला कसला आला मानपान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy