माणूस...
माणूस...
जगणं झाले महाग,
मरण झाले कवडीमोल,
श्वास होतोय किमती,
विश्वास आता लोप पावलाय,
कोमजतेय ओढ नात्यांची,
तुटत आहेत माणसें,
मीच किती योग्य,
यातच जीवन चाललयं
स्पर्शालाही आज मुकतात माणसें,
न जमतात मैफिली,
न फुलते हस्य,
कुणालाच कुणाची येथे नाही येत किव,
जीवाचे पडले मदतीसही असतात सगळे भीत,
माणुसकी संपतेय,
जन्म घेत आहे कलियुग,
मदतीसही आपलेच करतात काचकुज,
रडण्यासही खांदा आज नाही,
माणसाला माणसाची किंमत नाही,
संपतोय माणसातला तो जिव्हाळा,
एकांकीपणाचा होतोय येथे सोहळा,
मनातच वेदनांचा घेऊन पसारा,
मरणाच्या दारात म्हणून चितांचा पडलाय सडा...
