STORYMIRROR

Padmakar Bhave

Inspirational

3  

Padmakar Bhave

Inspirational

माणूस

माणूस

1 min
131

नाते हे जन्मांतरीचे 

जपू हृदय कुपीत,

धागे मऊ रेशमाचे

ठेवू हे जपून नित,


गर्दीत या माणसांच्या

माणूस हरवला हो,

भरला गल्ला धनाने

माणूस गमावला हो,


चंद्राशी जडले नाते

यानाशी जडली दोस्ती,

माणूस पराया झाला

ही कसली हो प्रगती?


नाते हे जन्मांतरीचे

धन मैत्रीचे,स्नेहाचे

विरण्याच्या आधी धागे

 जपूया बहू मोलाचे,


तिरडीशी जाता देह

संपून जाईल खेळ,

विखरून जाण्याआधी

साधून घेऊ की मेळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational