माणूस माझी जात...
माणूस माझी जात...
मानवता धर्म माझा
माणूस माझी जात,
भेदभावाच्या विचारांना
प्रथमता माझी लाथ...
समतेचे गीत गातो
हात मदतीचा देतो,
पाईक मानवतेचा होतो
द्या बंधुत्वाची साथ...
जपू आदर्श महात्म्यांचा
शाहू, फुले, आंबेडकर, अण्णांचा,
जागर समतेच्या विचारांचा
द्या सोडून जातपात...
गाढून विषमतेला
घेऊन सदा समतेला,
प्रगतीपथावर चला
एक सारे सुख दुःखात...
सारे नांदू सुखाने
एकीने आनंदाने,
हवे आदर्श जीने
जपू या राष्ट्रहीत...
ऐक्याचा मंत्र देवू
सारेच भाऊ भाऊ,
प्रगतीचे गीत गाऊ
नांदो शाती जगतात...
