माणुसकी
माणुसकी
जन्म लाभला मानवाचा
योग असा घडून आला
पुण्य कमविण्यासाठी थोडे
चला जपू या माणुसकीला..०१
रडत्याचे पुसून अश्रू
पाठीला देऊ आधार
बिकट त्याच्या परिस्थितीत
करूया आपण सुधार...०२
गांजलेल्या त्या देहाला
झाकूया प्रेमाचे पांघरून
भुकेलेल्या त्या आत्म्याची
भूक मिटवू घास चारून....०३
राज्याचा रंक व्हायला
उशीर मुळीच लागणार नाही
वैभव जातील लयास तरी
माणुसकी ही वाचून राही...०४
याच माणुसकीने आपण
करूया थोडे जनहित
दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी
कार्यरत राहू अविरत.....०५
एकमेका सहाय्य करू
अवघे धरू सुपंथ
प्रसिद्ध या घोषवाक्यचा
अमल करू या जीवनात...०६
