STORYMIRROR

सुरेश पवार

Inspirational

3  

सुरेश पवार

Inspirational

माणसासारखा व्यावहार कर

माणसासारखा व्यावहार कर

1 min
254

माणसा तू माणूस म्हणून जन्मला,

माणसासारखा वाग,

मिळतो एकदाच जन्म,

जीवनात येऊन जनकार्याला लाग.।।।१।।।


झालास तू निर्दयी,

परोपकार तू विसरलास,

धनवान झालास तू पैशाने,

गुर्मीमध्ये राहून तू शेवटी हरलास.।।।२।।।


जन्म दात्या मतापित्याला,

वृद्धाश्रमात धाडीला,

काय तुझे जगणेरे मानवा,

मानवता धर्म का सोडीला.।।।३।।।


ज्याच्या मुळे सारे जग पाहिले,

त्याचाच तू संहार केलास,

माणूस म्हणून जगतो कशाला,

मतापित्याला सोडून का गेलास.।।।४।।।


रात दिन पैसा पैसा करतोस,

काय किंमत आहे तुझ्या वागण्याला

तू गुन्हेगार आहे या मानवजातीचा,

काय अर्थ आहे तुझ्या जगण्याला.।।।५।।।


कल्याण कर तू साऱ्याचा,

घे वसा जनकल्याणाचा,

दिनदुबळ्याची तू सेवा कर,

आधार हो तू जनमाणसाचा.।।।६।।।


सारे पाप धरणीवर फेडायचे,

धुवून घे तू अंतरात्मा,

घरोघरी होईल तुझा उदोउदो,

जीवनात येऊनी हो परमात्मा.।।।७।।।


माणसासारखा व्यवहार कर,

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार,

मेल्यावर सोबत मांजरपाट कापडच असते

जीवनात येऊन कर परोपकार.।।।८।।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational