STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

3  

Prashant Shinde

Abstract

मान टाकली...!

मान टाकली...!

1 min
361

मान टाकली.....!

पायाखालच्या गवताने


मान टाकली

आणि

मोडेन पण वाकणार

हे दाखवून दिले


सारे अंग अंग

मुळाशी आकसून घेतले

पंच प्राण एकवटले

आणि

अंतरात सारे साठवले....


दाहच इतका मोठा

काय करावे

त्याला कळाले नाही....

म्हंटले मनाशीच ते

येईल पुन्हा

उन्हाळ्या नंतर पावसाळा

फुलवू पुन्हा

मग हिरवा मळा....

पायाखालच्या गवताचे

ते मनोगत

अंतरास भावले


आणि

त्याच्या चिकाटीचे

मला खूप कौतुक वाटले....

त्याच्या सहनशीलतेने

मला बरेच काही शिकवले

जाता जाता

उद्याच्या दिवसाचे

एक नवे स्वप्न दाखवले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract