माँ साहेब जिजाऊ
माँ साहेब जिजाऊ
शुरवीर पराक्रमी माता
तुम्हीच अमुच्या दाता
धगधगता स्वराज्य अमुचा
इतिहास हा महाराष्ट्राचा
लेक कर्तबगार जाधवांची
वीर पत्नी शहाजीची
संस्कारांचे बीज पेरले
शिवबास बाळकडू पाजले
मातृत्वाला विसरले
छत्रपती शिवबास घडविले
स्वराज्याचा मनी ध्यास
रचला मराठ्यांचा इतिहास
धन्य धन्य जिजाऊ माता!
धन्य धन्य शिवबा राजा!
