STORYMIRROR

Alka Dhankar

Tragedy

4  

Alka Dhankar

Tragedy

माझ्या शेतकरी बापा

माझ्या शेतकरी बापा

1 min
274

असेच जमतील 

तू मरशील तेव्हा

ही प्रसिद्धीपिसाट गिधाडं

शेतकरीहत्येच्या नावाखाली

अन् देतील मथळे छापून वर्तमानपत्रात

शेतकरी बापा तुझ्या पंचनाम्याचे...


मुखवटे लावलेत इथे सर्वांनी

दया, माया, आश्वासन माणुसकी आणि बरेच काही

फक्त आणि फक्त स्वतःचा स्वाभिमान 

गहाण टाकून


का करतोस आशा, या परक्यांकडून

तू सर्वांचा पालनकर्ता, अन्नदाता

तू बघ एकदा तुझ्या चिमुकल्यांच्या डोळ्यात

तुझ्यावर असलेल्या विश्वासाने ठस्स भरलेत ते


बघ तुझ्या नावाची ती कपाळावर कोरलेली

लालचुटूक चंद्रकोर कशी लखलखतेय 

तुला मातकटलेल्या कपड्यात पाहून

तिचं सार जग फिरत असतं त्याच चंद्रकोरीभोवती


खूप येतील, उन्हाळे, पावसाळे 

कधी कधी मिळणार नाही साथ तुला निसर्गाची

पण तू तर काळ्या आईचा लेक 

घेईल ती तुला सांभाळून, फक्त पोकळ आश्वासनाला तू बळी पडू नकोस


पाहूच नको त्या बेईमान आभाळाकडे

जीवन आहे, तर संकटंही येतील

टाक त्यांना, मुळासकट नांगरून, वखरून

कर पुन्हा सुरवात त्या कासवासारखी

अन् साधून घे अखंड गतीतून सार्थकता


माझ्या शेतकरी बापा तू धन्य तू धन्य

तुच साऱ्या विश्वाचे पुण्य तूच पुण्य...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy