सर्व म्हणतात मी प्रेम चेहऱ्यावर केलंय,
पण खरं सांगू राव, मला प्रेमात विचारांनी नेलय
तुझ्या सौंदर्याने लोक बेभान झाले,
म्हणून प्रेमाची परिभाषा मला सांगायला लागले
आता विचार पडतोय मला,
प्रेम कसे असते, हे खरंच कळले काय त्यांना ?
विचारांच्या नगरीत मी आज मोकळी निघाली,
ज्या विचारांना कधी मोलही नव्हते आज ते विचार जास्त महत्त्वाचे झाले
कुणीतरी माझे शब्द खोटे म्हणून मला रडविले,
आज विचार करते, तर वाटते त्या शब्दांनीच मला घडविले.
माझ्या निरर्थकतेला सार्थक बनविले,
ज्याचे कधी कुणी स्वप्नही नव्हते बघितलं,आज त्या स्वप्नात मला घडविले
माझ्या विचारांना सुद्धा आता आलाय खूप विचार,
कारण माझ्या निरर्थक शब्दांनी आज मोल मिळविले.