Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance

2.5  

Rakesh More

Romance

माझ्या मनीचे प्रेमगाणे

माझ्या मनीचे प्रेमगाणे

1 min
162


तीच रात्र आसमंत

चांदण्यांना तेज नसे

माझ्या मनीचे प्रेमगाणे

परी तुला सांगू कसे ||0||


चित्र रेखियले तुझे

हृदयावर या प्रितीने

तुला न कळता प्रेम केले

आगळ्याच रीतीने

तुझेच स्वप्न लोचनी माझ्या

तीनही प्रहर वसे

माझ्या मनीचे प्रेमगाणे

परी तुला सांगू कसे ||1||


असता समीप तूच माझ्या

देखणी वाटे निशा

गंध तुझा दरवळता सखे

गंधल्या दाही दिशा

वाऱ्यातूनी तरळतात

कर्णमधुर सूर जसे

माझ्या मनीचे प्रेमगाणे

परी तुला सांगू कसे ||2||


प्रीत तुझी ही का वसते

माझ्या रोमारोमातुनी

साद देतो आज तुजला

मनाच्या गाभाऱ्यातूनी

तोडलेस जर हृदय माझे

आज होईल ग हसे

माझ्या मनीचे प्रेमगाणे

परी तुला सांगू कसे ||3||


स्पंदनाची संवेदना ही

अंतरी माझ्या उठे

हुरहूर ही प्रीतीची

आज अचानक कुठे

या प्रीतीचे पडसाद उठती

हृदयी जसेच्या तसे

माझ्या मनीचे प्रेमगाणे

परी तुला सांगू कसे ||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance