STORYMIRROR

Sonam Thakur

Romance

3  

Sonam Thakur

Romance

माझ्या काव्यात तू

माझ्या काव्यात तू

1 min
291

आहे तुझाच भास सभोवताली

माझ्या श्वासात तू

ग्रीष्मात बनुनी थंडगार वाऱ्याची झुळक

येतोस तू


प्रभात समई बनुनी रविकिरण

अवनी वर उतरसी तू

माझ्या मन मंदिरात सारे चराचर व्यापूनी तू


तृणावरल्या दव बिंदूतही

मोत्या सम भासतोस तू

बनुनी राजकुमार माझ्या हृदय मंदिरी 

राज्य करणारा तू


तुझ्यात मी आणि माझ्यात तू हरवूनी

माझं अस्तित्व जपणारा तू

बनुनी अक्षरांची गुंफण माझ्या कवितेतील शब्द तू

ओठावरील गुणगुणार्या माझ्या काव्यात तू


माझी जिद्द तू , माझी उमेद तू

आहेस माझ्या जगण्याची ताकद तू

माझे स्वप्न ही तू, माझे सत्य ही तू

आहेस माझ्या जगण्याची दिशा ही तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance