STORYMIRROR

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

माझी शब्द फुले

माझी शब्द फुले

1 min
243

शब्द फुले माझी ,

नव्याने जाहली,

सुंदर सुगंधाने 

 ती दरवळली ...!


शब्दरजनीच्या ,

साथीने रचीली ..

काव्य स्वरूपात ,

ती अवतरली !


शब्द सानिध्यात ,

मी गहिवरते ,

दुःखी मन माझे ,

आनंदात न्हाते !


परिमळ आला ,

शब्दफुलांचा ,

गेला ठेऊनिया ,

सुगंध तयांचा !


चांदणे शब्दांचे,

ओंजळीत आले ,

चंद्राच्या साक्षीने ,

शिंपित मी गेले !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational