माझी मायबोली
माझी मायबोली
*मराठी भाषा दिन येता*
*कौतुक गजर सारे करतात*
*चार चौघात बोलतांना*
*मराठीला गौण समजतात!!१!!
*इंग्रजी माध्यम शाळेत*
*मुलांना पालक घालतात*
*इंग्रजी मुलं छान बोलता*
*असे आनंदाने सांगतात* !!२!!
*असे हे भयानक वास्तव*
*गंभीर कदाचित वाटत नसेल*
*दिसायला बोलायला पण*
*भविष्य मराठी भाषेला नसेल* !!३!!
*सर्वच भाषा चांगल्या*
*आदर त्यांचा करूया*
*पण आपापसात मात्र*
*मराठीतच बोलूया* !!४!!
*जागा हो मराठी माणसा जागा हो*
*मायबोली मराठी भाषा संवर्धन करूया*
*मराठमोळी आपली संस्कृती ही*
*अभिमानाने वाचत बोलत जपुया* !!५!!