माझी माय ........
माझी माय ........
माय हे फक्त कवितेत असतं.
शब्दांची चौकट बनुन.
मोहरक्या शब्दांची बंदीशाही.
नकारू शकतो का खऱ्या अर्थाला.
विसरू शकतो का तुझ्या कर्तव्याला.
वाटेवरील ठसे पुसुन जातील.
खूप वाटेकरी निघून जातील
विखुरलेले शब्दांचे ठसे
वाटेवर उमटतील .
तिथेच उभा राहुन
खोटे नाटे रेखाटीन
समुद्र तुझ्या पायाशी लोळवीनं
नदीला तुझ्या पदरा आड लपवीन.
ऊनात आवकाळ पाऊस पाडून
भरतीच्या पुरासारखे शब्द लिहून काढीन .
काहिही लिहिन.
तु त्याहुन जास्त अशील.
माय फक्त कवितेत नसतं
ते दैवत मनात घर करत.
