STORYMIRROR

Shobha Wagle

Children

3  

Shobha Wagle

Children

माझी माऊ (बालकविता)

माझी माऊ (बालकविता)

1 min
558

छान छान माऊ माझी गोरी पान

इवले इवले डोळे तिचे घारे छान

लांब लांब शूपूट बघा झुपकेदार

वाघाची मावशी म्हणून ठेवतो मान


सकाळी येऊन मला म्यावं म्यावं

करून माझ्या पांघरुणात घुसते

लाडी गोडी लावते मला दुधासाठी 

माझ्याच पायांशी सारखी घुटमळते.


मासे तिला लागतात खायला फार

घरची राणी म्हणून मोतीवर रागवते

आणि जर आला कधी उंदीर मामा

तर उडी मारून त्याचा फडशा पाडते.


काऊला म्यावं म्यावं करून पळवते

डोळे मिटून झोपेचे सोगं घेऊन बसते

अन् जरा कुठून तिला आवाज आला

कान टवकारून ईकडे तिकडे बघते.


माझी मनी माऊ मला फार आवडते

तिच्यासाठी मी मासे अन् दूध ठेवते

तिच्या संगे खेळण्यात मजा मला येते

तिच्या शिवाय मला मुळी करमत नसते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children