STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Abstract Classics Children

3  

Prof. Shalini Sahare

Abstract Classics Children

माझी लाडकी ताई

माझी लाडकी ताई

1 min
426

मोठी असो वा छोटी

हक्काने भांडणारी

खूप खूप रागवणारी

डोळ्याने धाकात ठेवणारी

          अशी एक बहिण नक्की असावी


आईचीचं ती सावली, 

हक्काची माऊली

लाडाने धपाटा घालणारी

दुसऱ्यांच्या रागापासून पाठी घालणारी

          अशी एक गोड बहिण नक्की असावी


ताई असते हक्काचा विसावा

ह्रुदयात अखंड खलखळता झरा

जिथे असतो प्रेमाचा ओलावा

कर्तव्यात नेहमीचं मुकुटमणी हिरा

          अशी लाडकी एक बहिण नक्की असावी


मी आहे असा भाग्यवान

मी कृष्णसखा प्रेमाचा भुकेला खरा

दिलंय त्याने मला प्रेमाचे हे दान

ती माझी सुभद्रा, मला लाभलेला अनमोल हिरा

  अशी एक प्रेमळ बहिण प्रत्येकालाच नक्कीअसावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract