माझी जन्मभुमी
माझी जन्मभुमी
मी चालले होते माझ्या गावी
लहानपणीच्या आठवणी घेऊन
प्रत्यक्षात पोहोचले तेव्हा कळले
माझे घर सारे पडले होते..
पाहून वाटले मला फार फार दुःख
क्षणात मी हरविले स्वप्नात
आणि मग मीच विसरले दुःख सारे
आठवु लागल्या सारी आठवणी
घराच्या अंगणात मी खेळु लागले
भातकुलीचा खेळ मांडला
बाहुला बाहुलीच लगीन लाविले
मन आनंदाने नाचु लागले
हे सर्व घडत होते स्वप्नात
स्वप्नातुन जागे झाले तेव्हा
कळले इथे काहीच नाही उरलं
उरल्या फक्त आणि फक्त खाणाखुणा.
