माझी आजी
माझी आजी


तुझ्यामुळे माझे
बालपण छान गेले
तुझ्यामुळे मला
बटव्या बद्दल कळले
तुझ्या बाल-संस्काराने
आम्ही घडलो
तु शिकवलेल्या सवयीमुळे
वागायला तसे लागलो
 
; ओंजळीतले खायला तु
सर्वांना वाटुन दयाची
रडवेला माझा चेहरा
तु पदराने पुसायची
येणार ते जाणार
हे ईश्वराने ठरवले
तुझ्या आठवणीने
माझे डोळे पाणावले