STORYMIRROR

Rajesh Sabale

Romance

2  

Rajesh Sabale

Romance

माझे राणी

माझे राणी

1 min
14.7K


माझे राणी तुझ्यासाठी करतो, मी सात बारा कोरा।

अन माहेराहून सासरी आली तू, अर्धांगीनी होऊन घरा।।धृ।।

किती जन्माचे पुण्य माझे, आज आले फळा।

सांज-सकाळी घरी-दरी, तू फुलविलास मळा।।

आई-बाप माझे तरी, तू तुझेच म्हणून जपलं।

अन घर दोघाचं असतं, हे आता मनोमन पटलं।।

मी तुझा प्रेम सखा जरी , तरी तू सखी सावरी घरा।

माझे राणी तुझ्यासाठी करतो, मी सात बारा कोरा।।१।।

तुझा माझा संसार आपला , सोन्या सारखा करू या।

अन एकमेकांच्या सुखासाठी, आपण दोघे राबू या।।

दोन चाक संसाराची आता, समसमान चालू दे।

अन तुझ्या संस्काराची फळ, मला जरा चाखू दे।।

दोन्ही घरच्या संस्काराचा, आता मिरवू या जरा तोरा।

माझे राणी तुझ्यासाठी करतो, मी सात बारा कोरा।।२।।

तू सकाळी लवकर उठूनी करते, सडा समार्जन सारे।

रात्री उशिरा निद्रा घेण्या आधी तू, घर सावरते सारे।।

हवे नको ते मुला-बाळांना, सारे काही तूच देते।

माय-बाप माझे असले तरी, त्यांना प्रेमाने भरविते।।

तुझ्या या प्रेमासाठी बायको, तुला घेऊन आलो घरा।

माझे राणी तुझ्यासाठी करतो, मी सात बारा कोरा।।३।।


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance