STORYMIRROR

Mahendrakumar Patle

Abstract Others Children

3  

Mahendrakumar Patle

Abstract Others Children

माझे मागणे...

माझे मागणे...

1 min
171

लावलेले रोपटे आता फुलवा ना 

गुरुजी तुम्ही जरा शिकवा ना||धृ||


तुम्ही माय बाप, सखा सोबती

माया असे आमची तुम्हावरती

श्रीगणेशा करितो तुमच्या संगती

नव्या जगाची दारे उघडा ना||१||


घंटी वाजता गजबजते शाळा 

फळ्याचा काही उघडेना डोळा

बसवत राहता शापोआचा ताळा 

लवकर हिशोब हे जुळवा ना||२||


कधी सभा तर कधी प्रशिक्षण

त्यात बुडते रोजचे शिक्षण

गुरुजी स्वत:चे करा निरीक्षण 

पाटी पुस्तकांचा मेळ बसवा ना||३||


पुस्तक, गणवेश, शिष्यवृत्ती टपाल

ओझ्याखाली गुरुजी सतत दबाल 

भाषा गणिताशी गट्टी कशी घडवाल

विज्ञानजगाचा मार्ग दाखवा ना||४||

 

रोज बदलती शैक्षणिक धोरणे 

मांडव टाकून लावावी तोरणे

कधी थांबवाल वर्गाचे घोरणे 

पाच पंचवीस पट टिकवा ना||५||


आईबाबास नाही गंध शिक्षणाचा 

सतावतो रोज प्रश्न भाकरीचा 

वाटे अभिमान तुमच्या नौकरीचा

कोळशातून हिरे घडवा ना||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract