STORYMIRROR

Mahendrakumar Patle

Tragedy

3  

Mahendrakumar Patle

Tragedy

आत्मक्लेश

आत्मक्लेश

1 min
257

******************************

तीव्र वेदनेने, आत्मा रोज जळतो

खून भावनांचा होता, मन हा रडतो||धृ||


येथे आडफाटे, रोज कामात येती 

वरीष्ठ आडवळणाने, रोज त्रास देती

सांगावे दुःख कोणा, नाही संगाती

उघड बोलण्यास, अंतरात्मा येथे डरतो||१|| 

     खून भावनांचा होता.....


उगा उदद्व्याप सारे, नाही परिणाम 

कर्तव्यकसूर केल्यास, बडतर्फीचे फरमान

नाही तमा आता, पूर्ण होऊदे अरमान 

कुणाच्या हवास्यापोटी, रोज कोणी मरतो||२||

     खून भावनांचा होता.....


दूर माझे आप्तस्वकीय, नाही गाठभेट

बंधनांच्या पायी आता, झालो चेकमेट 

भेट आता कशी घेवू, तयांची थेट

प्रेम पाखरू साधा, पोटासाठी राबतो||३||

     खून भावनांचा होता.....


चित्त नाही थाऱ्यावर, मन सैरभैर 

आवळू नका फास, करा सैलसर

घेऊ द्या विश्रांती, आता घटिकाभर 

प्रसन्न मनाने, पुन्हा आपल्यात रमतो||४||

     खून भावनांचा होता.....

*******************************


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy