साजणे
साजणे
तुझ्या मनातील भावनांचा, होऊ दे खुलासा
प्रेमात सखी तुझ्या, मी झालो वेडापिसा||धृ||
हा डाव सोंगटयांचा, रंगला आता जरासा
तो नेत्रकटाक्ष तुझा, देऊन गेला दिलासा||१||
लालचुटूक अधरांनी, टाकलाय नवा फासा
अडकून गेला पुरता, दुबळा हा मासा||२||
ही कानातील झुमके, घेतात मनाचा कानोसा
गालावरचा तीळ साजणे, घायाळ करतो पुरेसा||३||
तुझ्या प्रितीचा गुलाब, मनी फुलवितो आशा
जाऊ नको दूर, मनाची होईल निराशा||४||
नको मांडू सखे, माझ्या प्रेमाचा तमाशा
फुललेल्या श्वासांना, जरा घेवू दे उसासा||५||

